‘मी हिंदू असू शकत नाही’ : वेदनेपासून सुरू झालेली आणि विद्रोहापर्यंत जाऊन पोहोचलेली लक्षवेधी संघर्षयात्रा
हे एका कार्यकर्त्याने लिहिलेले आत्मकथन आहे. त्यामुळे यात एका पाठोपाठ एक दलित अत्याचारापासून जातीय दंगलींपर्यंतच्या घटना येत-जात राहतात. त्या मांडताना भंवर मेघवंशी ज्या नेमकेपणाने विश्लेषण करत जातात, ते वाचून तुमचा तुम्हालाच शोध लागतो की, समस्येचा स्रोत कुठल्या फांदीत नव्हे तर झाडाच्या मुळांमध्ये आहे. दोषाचे मूळ कुठल्या सुट्या भागांमध्ये नाही, कॉम्प्युटरच्या मदरबोर्डमध्ये आहे.......